(जाहिरात बातमी) : सुमित जोशी यांची ‘इंडियन एअरफोर्स’मध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:29+5:302020-12-23T04:20:29+5:30
देशभरातून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी ही सामाईक परीक्षा दिली. त्यातून केवळ तीनशे विद्यार्थ्यांना एसएसबी मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. ...
देशभरातून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी ही सामाईक परीक्षा दिली. त्यातून केवळ तीनशे विद्यार्थ्यांना एसएसबी मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. त्यातून ९७ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये सुमित यांनी यश मिळविले. त्यांनी दुंडिगुल (हैदराबाद) येथील भारतीय वायुदल अकादमीमध्ये एक वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांची वायुदलात फ्लाईंग ऑफिसरपदावर नियुक्ती झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये, तर औरंगाबाद येथील उच्च माध्यमिक शिक्षक डिफेन्स सर्व्हिसेस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये झाले आहे. दंतवैद्य डॉ. मिलिंद जोशी, नयना जोशी यांचे ते सुुुपुत्र आहेत. कागल येथील इंडियन एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी वासुदेव तोरगलकर आणि न्यू हायस्कूलचे निवृत्त पर्यवेक्षक मधुकर जोशी यांचे ते नातू आहेत. त्यांना केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांनी शुभेच्छा दिल्या.
फोटो (२२१२२०२०-कोल-सुमित जोशी न्यूज फोटो