खंडपिठासाठी पुन्हा वकिलांचा एल्गार
By Admin | Published: September 24, 2014 01:11 AM2014-09-24T01:11:58+5:302014-09-24T01:15:44+5:30
रत्नागिरी बार असोशिएशनच्या विशेष बैठकीत निर्णय
रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपिठ कोल्हापुरात सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने दिले गेलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने वकिलांच्या विविध बार असोशिएनतर्फे पुन्हा आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आज रत्नागिरी येथे बार असोशिएशनसोबत विशेष बैठक घेण्यात आली
यामध्ये खंडपिठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष चर्चा केली. या आंदोलनाबाबत काय दिशा असावी, यासंदर्भातल्या सूचना रत्नागिरी बार असोशिएशनची बैठक झाल्यानंतर यासंदर्भातले सूचना कृती समितीला कळविल्या जातील. अशी माहिती या बैठकीत रत्नागिरी बार असोशिएशनचे अध्यक्ष फजल डिंगणकर यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष विवेक घाटगे, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, समितीचे अन्य सदस्य रत्नागिरी बार असोशिएनचे अध्यक्ष डिंगणकर, उपाध्यक्ष संकेत घाग, सचिव भाऊ शेट्ये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.