रणदेवीवाडीत २0 वर्षानंतर सत्तांतर--मुश्रीफ गटाचा पराजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:16 PM2017-10-18T19:16:32+5:302017-10-18T19:23:38+5:30
कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला.
कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला.
या निवडणूकीत माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य बाजीराव खोत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गत वीस वर्षात बाजीराव खोत यांनी या ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राखले होते. या निवडणूकीत देखील ते सदस्यपदासाठी रिंगणात व त्यांची पत्नी सुनिता यांना सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. उपसरपंच सुधाकर खोत यांनाही प्रभाग १ मधून तिकीट दिले होते. माञ यावेळी मतदारानी बाजीराव खोत यांच्या पॅनेलला पूर्णत: झिडकारले.
विजयी उमेदवार व त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
सरपंच शोभा दगडू खोत(६६६),सदस्य- नीरा तानाजी खोत(१९९), संतोष मारुती शिंदे(२१५),प्रदीप यशवंत खोत(२१५), सोनाली संभाजी देवमाने(२१०), अजित रामचंद्र खोत(२०५), सुजाता विलास पाटील(१९७), इंदूबाई विलास खोत(२५५), पद्मावती तानाजी चिखले(२६३),श्रीकांत मनोहर भोरे(२७५).
रणदेवीवाडी( ता.कागल) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सलग वीस वर्षे सत्ता असणा-यां बाजीराव खोत यांच्या मुश्रीफ गटाचा १०विरुद्ध ० ने पराभव करुन सत्ता मिळवल्यानंतर व्ही अशी खूण करुन विजयाचा आनंद साजरा करताना विजयी महिला उमेदवार.