तब्बल ३४ वर्षांनंतर ४० प्राध्यापकांना मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:19+5:302021-05-06T04:26:19+5:30
यानुसार महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळाला. अन्य विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाकडे काम करणाऱ्या प्राध्यापकांनाही त्याचा लाभ मिळाला. परंतु, दि. ...
यानुसार महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळाला. अन्य विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाकडे काम करणाऱ्या प्राध्यापकांनाही त्याचा लाभ मिळाला. परंतु, दि. १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी. प्राप्त करूनही शिवाजी विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाकडे काम करणाऱ्या प्राध्यापकांना मात्र, याचा लाभ मिळाला नाही. त्याबाबत या प्राध्यापकांसाठी असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲॅन्युएटेड टिचर्स महाराष्ट्र (ॲॅक्युसॅॅट) या संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. तीन वेतनवाढीचा लाभ मिळालेल्या या निवृत्त प्राध्यापकांमध्ये तीन माजी कुलगुरू, माजी कुलसचिव आणि विविध विभागांचे प्रमुख आहेत. या प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांचे सहकार्य लाभले. संघटनेचे शिवाजी विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप, सचिव डॉ. एम. आर. घाटगे, डॉ. जे. एफ. पाटील, एस. एन. पवार, एन. के. मोरे, पी. डब्ल्यू. देशमुख यांचे योगदान लाभले असल्याचे ॲॅक्युसॅॅचे कोल्हापूर सचिव डॉ. संभाजीराव पाटील यांनी बुधवारी पत्रकाव्दारे दिली.