अखेर निसर्गच धावला लोकांच्या मदतीला; तीन दिवस चांगली उसंत : जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:33+5:302021-07-27T04:25:33+5:30

कोल्हापूर : दोन दिवसांत अस्मानी संकट घेऊन आलेला निसर्गच मागील तीन दिवसांत लोकांच्या मदतीला धावल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास ...

After all, nature ran to help people; Three days of good spring: help to restore public life | अखेर निसर्गच धावला लोकांच्या मदतीला; तीन दिवस चांगली उसंत : जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत

अखेर निसर्गच धावला लोकांच्या मदतीला; तीन दिवस चांगली उसंत : जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत

Next

कोल्हापूर : दोन दिवसांत अस्मानी संकट घेऊन आलेला निसर्गच मागील तीन दिवसांत लोकांच्या मदतीला धावल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास येत आहे. शनिवारपासून सोमवारपर्यंत पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे मदतकार्यापासून जनजीवनही सुरळीत होण्यास मदत झाली. अखेर निसर्गालाच माणसाची दया आल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. सततचा कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे तयार झालेली भीती, दिवसभर उन्हाची तिरीप पडल्याने कमी झाली.

गेले तीन दिवस चांगले ऊन पडत आहे. त्यामुळे लोकांच्या जगण्यातही उत्साह जाणवत आहे. कोरोना, महापूर यासारखी संकटे लागोपाठ आली आहेत. त्यामुळे समाजाच्या मनांवर एक निराशेचे मळभ दाटून आले होते. त्यातच दोन दिवसांच्या धडकी भरवणाऱ्या पावसाने लोकांचे जगण्याचे वांदे करून टाकले. शेवटी निसर्गालाच दया आली आणि पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर चांगले ऊन पडल्याने लोकांना विविध कामांसाठी बाहेर पडणे शक्य झाले. भाजीपाला, औषधापासून जीवनोपयोगी वस्तू ते अगदी चिरमुरे-फुटाणेही जाऊन आणता आले. पाण्याची टंचाई होती; परंतु त्यावरही काही तरी शोधाशोध करता आली. पाऊस सतत कोसळत राहिला, तर घरातून बाहेर पाय काढता येत नाही. बाहेर पाऊस आणि दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्यांतही पाऊस, यामुळे नैराश्य वाढते. त्याला या तीन दिवसांत फाटा मिळाला.

या उघडिपीची बचावकार्यात नेमकी काय मदत झाली का, हे रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख अमरदीप पाटील यांच्याकडून ‘लोकमत’ने जाणून घेतले. ते म्हणाले, पाऊस थांबल्याने बचावकार्य फारच सुलभ झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला तातडीने मदत पोहोच करता आली. आमच्या हेल्पलाईनला दिवसभरात किमान कोल्हापूर शहरातून ४० हून अधिक फोन येतात. त्यांच्यापर्यंत जेवणासह, वैद्यकीय मदत पोहोचवताना पाऊस असताना आम्हाला मर्यादा येत असत. अनेक ठिकाणी सहा-सात लोक स्थलांतरित झाले आहेत. त्यांना जेवण पुरवायचे झाल्यास कारमधून नेताना पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची अडचण होत असे. आता मदतीचा फोन आला की, आमचे कार्यकर्ते लगेच मोटारसायकलवरून जाऊन हवी ती मदत पोहोच करत आहेत. रविवारी एका बाळाला रुग्णालयात न्यायचे होते. त्याच्यापर्यंत तातडीने पोहोचून बाळाला रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

हा निसर्गाचा हातभारच जणू...

एका अपार्टमेंटमधून जनरेटरचे पेट्रोल संपले म्हणून फोन आला, एक कार्यकर्ता तातडीने कॅनमधून पेट्रोल घेऊन त्यांना देऊन आला. अशी अनेक कामे पाऊस नसल्याने करणे सहज शक्य झाले. अमरदीप पाटील यांच्यासोबत सातजण गेले चार दिवस हे मानवतेचे काम करत आहेत व हे काम सुलभ होण्यास निसर्ग हातभार लावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: After all, nature ran to help people; Three days of good spring: help to restore public life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.