'अमूल'नंतर ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ होणार? गोकुळच्या अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:29 PM2023-02-04T14:29:52+5:302023-02-04T14:30:12+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती; मात्र..
कोल्हापूर : ‘अमूल’ दूध संघाने दूध खरेदी व विक्री दरात वाढ केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) भूमिकेकडे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत; मात्र तूर्ततरी ‘गोकुळ’ दूधदरात वाढ होण्याची शक्यता धूसर आहे.
‘अमूल’ दूध संघाने राज्यात म्हैस व गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव दरानुसार ‘अमूल ताजा’ दुधाचा दर प्रतिलिटर ५४ रुपये ‘अमूल गोल्ड’ दूध ६६ तर अमूल गायीचे दूध प्रतिलिटर ५६ रुपये दर आहे. ‘अमूल’ ने दूध खरेदी व विक्री दरात वाढ केल्यानंतर ‘गोकुळ’चा निर्णय काय? याबाबत शुक्रवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती; मात्र तूर्त दरवाढ करण्याची शक्यता धूसर आहे.
‘अमूल’चे दर विविध भागात वेगवेगळे असतात. ‘गोकुळ’ने अद्याप दूध दरवाढीबाबत निर्णय घेतलेला नाही. नजीकच्या काळात परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ. - विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)