नारळ फोडल्यानंतर आता पाणी जाणार नाही वाया, कोल्हापुरातील संशोधकाने तयार केले खास यंत्र
By सचिन भोसले | Published: February 10, 2023 05:05 PM2023-02-10T17:05:09+5:302023-02-10T17:05:44+5:30
आरोग्याला उपयुक्त असलेले नारळातील पाणी जायचं वाया
कोल्हापूर : घराजवळील मारुती मंदिर असो वा दख्खनचा राजा जोतिबा असो अथवा गावातील ग्रामदैवत असो. त्या देवाला अर्पण करण्यासाठी आपण नारळ, कापूर ,उदबत्ती असे नियमित नेतो. नारळ देवळा बाहेर वाढविला जातो.त्यातील बहुमूल्य पाणी वाया जाऊ नये, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रा. दत्तात्रय सुतार यांनी संशोधनातून खास अगदी स्वस्तातले यंत्र तयार केले आहे.
अनेक मंदिरात हमखास देवाला अर्पण म्हणून नारळ वाढविला जातो. या नारळातील पाणी फोडल्यानंतर क्षणात खाली पडून जाते. हे वाया जाणारे आरोग्याला चांगली असणारे पाणी वाया जाते. याचा कोणी गांभीर्याने विचार करीत नाही हीच बाब जाणून शास्त्रीय तंत्रनिकेतन मधील प्रा. दत्तात्रय सुतार यांनी तीन ते चार महिने विविध मंदिरांमध्ये जाऊन नारळ किती फोडले जातात व त्यातून पाणी किती वाया जाती याचा अभ्यास केला.
याचा विचार करून २ फूट उंचीचे मशीन बनवले. वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आला. त्याखाली स्टीलचा ट्रे बसविला.यात फोडलेल्या नारळाचे पाणी एकत्र संकलित केले.ट्रेला चारही कोपऱ्यांना होल केले आणि पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले. या यंत्राला बनवण्यासाठी पाच हजार रूपये खर्च आला आहे. याचे पेटंट केलेले नाही. त्यामुळे बेरोजगारांना या यंत्रा त सुधारणा करून रोजगार निर्मिती करता येते.
आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे नारळ पाणी देवळा बाहेर असे वाया जाते. याची चिंता वाटली आणि मेकॅनिकल विभागातील अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती हे यंत्र स्वस्तत मस्त तयार केले - प्रा.दत्तात्रय सुतार