एक तास घिरट्या घालून विमान परतले हैदराबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:23+5:302021-06-04T04:20:23+5:30

कोल्हापूर : खराब हवामान असल्याने हैदराबाद होऊन आलेले विमान गुरुवारी दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरू शकले नाही. एक तास कोल्हापूर ...

After hovering for an hour, the plane returned to Hyderabad | एक तास घिरट्या घालून विमान परतले हैदराबादला

एक तास घिरट्या घालून विमान परतले हैदराबादला

Next

कोल्हापूर : खराब हवामान असल्याने हैदराबाद होऊन आलेले विमान गुरुवारी दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरू शकले नाही. एक तास कोल्हापूर परिसरात घिरट्या घालून हे विमान हैदराबादला परतले.

हैदराबाद येथून दुपारी दोनच्या सुमारास निघालेले विमान कोल्हापूरमध्ये साडेतीनच्या सुमारास आले. मात्र, त्यावेळी कोल्हापुरात पाऊस सुरू असल्याने निर्माण झालेल्या खराब वातावरणामुळे कोल्हापूर विमानतळावर उतरविणे शक्य झाले नाही. विमानतळ परिसरातील वातावरण विमान उतरविण्यासाठी योग्य होईल याची प्रतीक्षा करत एक तास हे विमान कोल्हापूर परिसरात आकाशात घिरट्या घालत होते. पण, वातावरणात फार काही बदल झाला नाही. त्यामुळे साडेचारच्या सुमारास हे विमान हैदराबादला रवाना झाले. दरम्यान, याबाबत कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे विमान कोल्हापूर विमानतळावर उतरू शकले नाही. आम्ही प्रयत्न केले. पण, वातावरण खराब असल्याने या ठिकाणी विमान उतरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते पुन्हा हैदराबादला परतले.

Web Title: After hovering for an hour, the plane returned to Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.