जयसिंगपूरनंतर आता कुरुंदवाड होणार भूकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 04:35 AM2020-03-02T04:35:23+5:302020-03-02T04:35:27+5:30

जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करणाऱ्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने आता कुरुंदवाडला भूकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

After Jaisingpur, Kurundwad will now be hunger free | जयसिंगपूरनंतर आता कुरुंदवाड होणार भूकमुक्त

जयसिंगपूरनंतर आता कुरुंदवाड होणार भूकमुक्त

Next

चंद्रकांत कित्तुरे 
कोल्हापूर : जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करणाऱ्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने आता कुरुंदवाडला भूकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी सर्व्हे सुरू आहे. निराधार, अपंग, वृद्ध यांच्यासाठी असलेला हा उपक्रम ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. जयसिंगपूर शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जयसिंगपूर युवा फाऊंडेशनने शहरातील गरीब, हलाखीत जीवन जगणारे वृद्ध, निराधार, अपंग, मानसिक रुग्ण यांच्यासाठी पाच वर्षांपूर्वी दररोज दोन वेळचे जेवण, सकाळी नाष्टा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या शहरातील ६५ वृद्ध निराधारांना दररोज भोजन, नाष्टा दिला जातो. दोन्ही वेळचे जेवण सकाळीच दिले जाते. देणगीदारांच्या मदतीमधून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला कनकभाई शहा, भाऊसाहेब नाईक, डॉ. गनबावले, डॉ. प्रवीण जैन, सुदर्श कदम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. जयसिंगपूरनंतर हा उपक्रम तालुक्यात वाढवावा, असा विचार पुढे आल्यानंतर शिरोळ तालुक्यातील दुसरे मोठे शहर म्हणून कुरुंदवाड शहराची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टीने कुरुंदवाडमधील वृद्ध, अपंग, निराधार, विकलांग यांचा सर्व्हे सुरू आहे अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अझहर पटेल यांनी केले आहे.
>आरोग्य तपासणीही
जयसिंगपुरात ज्यांना भोजन, नाष्टा दिला जातो. त्या सर्वांची महिन्यातून एकदा डॉक्टरांकडून तपासणीही केली जाते. येत्या ४ एप्रिलला फाऊंडेशनच्या या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.

Web Title: After Jaisingpur, Kurundwad will now be hunger free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.