दबाव आणाल तर रोस्टरनंतरच ‘एनओसी’

By admin | Published: August 17, 2016 12:04 AM2016-08-17T00:04:41+5:302016-08-17T00:05:08+5:30

गुरूजींनी मागितला ‘अल्टिमेटम’ : ‘सीईओं’नी दिली तराटणी; सेवाज्येष्ठता यादीनुसार संधी देण्याची ग्वाही

After the pressure, the 'NOC' | दबाव आणाल तर रोस्टरनंतरच ‘एनओसी’

दबाव आणाल तर रोस्टरनंतरच ‘एनओसी’

Next

कोल्हापूर : रोस्टर पूर्ण होईपर्यंत सेवाज्येष्ठता यादीनुसार रिक्तपदी संधी देण्याचे धोरण ठरले असताना ढोल-ताशे वाजवून व उपोषण करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. कोणाकडे ‘अल्टिमेटम’ मागता, शिक्षक म्हणता मग शाळा सोडून असे वागणे शोभते का? समाजाला काय संदेश देता, अशाप्रकारे दबाव आणाल तर रोस्टर पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात या, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला तराटणी दिली.
आंतरजिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर ढोल-ताशांचा गजर करत मोर्चा काढून दारात उपोषणास सुरुवात केली आहे. शिष्टमंडळ मागणीचे निवेदन घेऊन डॉ. खेमनार यांनी भेटण्यासाठी गेले. गेली वीस वर्षे जिल्ह्याबाहेर राहत आहे, सर्व प्रवर्गाच्या ५५७ जागा रिक्त आहेत, या प्रवर्गातील २४८ शिक्षक जिल्ह्णात येण्यास इच्छुक आहेत.
जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवून कंटाळा असल्याचे सांगत ‘एनओसी’ कधी देता, आम्हाला अल्टिमेटम द्या, असे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सुनील पोवार यांनी सांगितले. त्यावर काहीसे संतप्त झालेले डॉ. खेमनार यांनी कपाळावरील भंडारा कसला, आंतरजिल्हा बदली किती वर्षांनी होते, बंदूक डोक्यावर ठेवून उपोषण व ढोल-ताशा कशासाठी वाजवता? अशी विचारणा करत असे आंदोलन करून शिक्षण विभागाला बदनाम करायचे आणि त्याच विभागात काम करायचे हे योग्य नाही. रोस्टर आल्याशिवाय बदलीची प्रक्रिया राबविता येत नाही तरीही सेवाज्येष्ठता यादीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यावर हरकत घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
लवकरात लवकर ही प्रक्रिया राबवत असताना पुन्हा रोस्टरमध्ये दोष राहू नये, याची दक्षता घ्यावी लागत असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले. बदल्यांबाबत उलटसुलट चर्चा आहे, पण कोणत्याही परिस्थितीत पारदर्शकच ही प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद अवघडी, सरदार कांबळे, शुभांगी कानिटकर, अर्चना माने, अर्चना लिमकर आदी उपस्थित होते.

Web Title: After the pressure, the 'NOC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.