सेवानिवृत्तीनंतर सत्संगाची जोड देऊन आयुष्य घालवावे - विश्वास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:14+5:302021-07-18T04:17:14+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांनी अल्प पगारावर कष्टाचे काम केले. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सत्संगाची जोड देऊन त्यांनी उर्वरित आयुष्य ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांनी अल्प पगारावर कष्टाचे काम केले. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सत्संगाची जोड देऊन त्यांनी उर्वरित आयुष्य घालवावे, असे आवाहन ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
ज्ञानदेव पाटील, शिवाजी पाटील, जगन्नाथ कांबळे, जगदीश सावर्डेकर, शंकर शिरगावे, उमेश शेळके, आनंदा मगदूम, आनंदा खोत, तानाजी मगदूम, प्रकाश पाटील, बळवंत परीट, श्रीरंग पाटील, पांडुरंग कांबळे, केशव पाटील, सदाशिव खोत, बळवंत पाटील, प्रकाश खोत, साताप्पा चौगले, बसगोंडा पाटील, सुरेश सोलापुरे, चंद्रकांत झिरले, यशवंत पोवार, बंडा मोहिते, पंडित पाटील, मंगल माने यांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील व अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक व संघाचे अधिकारी उपस्थित हाेते. (फोटो-१७०७२०२१-कोल-गोकुळ)