बंदोबस्तानंतर पोलीसही उतरले स्वच्छता मोहिमेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:26+5:302021-04-28T04:27:26+5:30

कोल्हापूर : चैत्र यात्रेचा पोलीस बंदोबस्त झाला, पण तेवढ्यावरच न थांबता बंदोबस्तातील दोन पोलिसांनी मंगळवारी श्री जोतिबा मंदिर आवारात ...

After the security, the police also went on a clean-up operation | बंदोबस्तानंतर पोलीसही उतरले स्वच्छता मोहिमेत

बंदोबस्तानंतर पोलीसही उतरले स्वच्छता मोहिमेत

googlenewsNext

कोल्हापूर : चैत्र यात्रेचा पोलीस बंदोबस्त झाला, पण तेवढ्यावरच न थांबता बंदोबस्तातील दोन पोलिसांनी मंगळवारी श्री जोतिबा मंदिर आवारात स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी केलेल्या स्वच्छता मोहीम उपक्रमाला हातभार लावला. पोलिसांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

सोमवारी दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी श्री क्षेत्र जोतिबा मंदिरासह डोंगरावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कोरोना संसर्गामुळे नागरिकांना यात्रेत सहभागी होण्यास प्रतिबंध केले होते. या बंदोबस्तासाठी आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस चेतन घाटगे व अमर अडसुळे यांची नेमणूक केली होती. ते बंदोबस्त बजावत असताना तेथे काही तरुण आले. त्यांनी आम्ही पालखी मार्गाची स्वच्छता करू का, अशी त्यांच्याकडे परवानगी मागितली.

दरवर्षी यात्रेपाठोपाठ गुलाल धुऊन काढण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढाकार घेतात; पण मंगळवारी काही तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहिमेची स्वत:हून तयारी दर्शवली. अशा चांगल्या उपक्रमाला पोलिसांची नेहमीच साथ राहते. त्यामुळे त्या दोन पोलिसांनी त्या तरुणांना तुम्ही स्वच्छता करा, आम्हीही बंदोबस्तानंतर मिळालेल्या रिकाम्या वेळेत तुमच्या उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हातभार लावतो. असे सांगून ते दोघे पोलीसही बंदोबस्तानंतर हातात झाडू, बुट्ट्या घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पोलीस स्वतः स्वच्छता करत असल्याचे पाहून तरुणांनीही तितक्याच उत्साहाने पालखी प्रदक्षिणा मार्गासह मंदिर परिसर चकाचक केला. या मोहिमेत सुमारे दीड टन कचरा संकलित केला. या उपक्रमांत ओंकार निकम, प्रथमेश चौगुले, आदेश चोरगे, संग्राम निकम, गणेश निकम, श्‍लोक निकम, अविनाश सातार्डेकर, निरंजन जुगर, शौर्य सातार्डेकर आदींनी सहभाग घेतला होता.

फोटो नं. २७०४२०२१-कोल-जोतिबा०१,०२,०३

ओळ : चैत्र यात्रेनंतर मंगळवारी जोतिबा मंदिर व पालखी प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम केली. यामध्ये पोलीसही हातात झाडू, बुट्ट्या घेऊन सहभागी झाले होते.

===Photopath===

270421\27kol_10_27042021_5.jpg~270421\27kol_11_27042021_5.jpg~270421\27kol_12_27042021_5.jpg

===Caption===

ओळ : चैत्र यात्रेनंतर मंगळवारी जोतिबा मंदीर व पालखी प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम केली. यामध्ये पोलिसही हातात झाडू, बुट्ट्या घेऊन सहभागी झाले होते. ~ओळ : चैत्र यात्रेनंतर मंगळवारी जोतिबा मंदीर व पालखी प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम केली. यामध्ये पोलिसही हातात झाडू, बुट्ट्या घेऊन सहभागी झाले होते. ~ओळ : चैत्र यात्रेनंतर मंगळवारी जोतिबा मंदीर व पालखी प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम केली. यामध्ये पोलिसही हातात झाडू, बुट्ट्या घेऊन सहभागी झाले होते.

Web Title: After the security, the police also went on a clean-up operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.