अनेक दिवसांनंतर रुग्णसंख्या हजारच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:21+5:302021-06-22T04:18:21+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात ...
कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा एक हजाराच्या खाली आला. सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ९४० रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३३ जणांचा मृत्यू झाला. १८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्याही दहा हजारांच्या आत आली असून, सध्या ९ हजार २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोल्हापूर शहरात २६५, करवीर तालुक्यात १५३, तर हातकणंगले तालुक्यात १३४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १५ मृत्यू असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात सातजणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सारेच चिंतेत होते. परंतु, आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे; परंतु मृत्यू मात्र अजूनही ३० च्या वर आहेत. ही संख्या कमी होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी आल्याने बेडसह विविध आरोग्यविषयक गरजांचा जिल्हा आरोग्य यंत्रणावरील ताण कांहीसा कमी आला आहे.
चौकट
सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात
कोल्हापूर १५
शुक्रवार पेठ, शिवाजी पार्क, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत, राजोपाध्येनगर, यादवनगर, गजानन महाराज नगर, शाहू मिल कॉलनी, नवीन वाशी नाका, कदमवाडी, रुईकर कॉलनी २, सम्राटनगर, विचारे माळ
करवीर ०७
वाशी, प्रयाग चिखली, निगवे दुमाला २, कोथळी, शिये, शिंगणापूर
हातकणंगले ०३
हेर्ले २, कबनूर
शिरोळ ०२
टाकळेवाडी, टाकवडे
गडहिंग्लज ०१
शिप्पूर
शाहूवाडी ०१
पनोरी
आजरा ०१
पोळगाव
इतर ०३
अंकली, पाडळी, मनगुत्ती