chandrakant patil: राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:43 PM2022-04-01T12:43:42+5:302022-04-01T12:51:59+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ही लढत ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ही लढत महाविकास आघाडीबरोबर भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. प्रचारादरम्यान सुरु असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर मात्र चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग झाले.
मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला व गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तळेमाऊली मंदिर परिसरात पाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी बांधव टाळ मृदंगाच्या तालावर विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही यात सहभागी होऊन, विठूराया घ्या नामाचा जयघोष केला.
राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/sWv0NsLqqU
— Lokmat (@lokmat) April 1, 2022