'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:49 AM2022-05-26T10:49:11+5:302022-05-26T10:55:06+5:30

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

After the Shiv Sena announced the name of the sixth candidate for Rajya Sabha, Sambhaji Raje Chhatrapati has expressed his feelings. | 'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना

'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना

Next

कोल्हापूर- विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. शिवसेनेकडून संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित होती, मात्र दुसऱ्या जागेसाठी पक्षाकडे अनेक पर्याय होते. त्यातच पुरस्कृत म्हणून महाविकास आघाडीने पाठबळ द्यावे, असा माजी खासदार संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेने नकार देत अनपेक्षितपणे शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे केले.

संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. 

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी ट्विट करुन आपलं मत स्पष्ट केलं आहे. महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय... मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी... मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..., अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक झाली. यामध्ये संभाजीराजेंचा प्रस्ताव, भाजपची भूमिका आणि चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठीची रणनीती याबाबत चर्चा झाली. अखेर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि संजय पवार यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. रात्रीच पवार यांना पक्षाचा अधिकृत ए व बी फॉर्म देण्यात आला. बुधवारी दिवसभर संजय राऊत व संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जांसोबत लागणारी कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी एक वाजता राऊत व पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते- 

संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.

Web Title: After the Shiv Sena announced the name of the sixth candidate for Rajya Sabha, Sambhaji Raje Chhatrapati has expressed his feelings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.