दीड वर्षानंतर शिवाजी विद्यापीठ गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:32+5:302021-09-07T04:29:32+5:30

कोरोनामुळे शासन आदेशानुसार गेल्यावर्षी मार्चच्या अखेरीस विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अवघ्या पाच टक्क्यांवर आली. जूनच्या दरम्यान ...

After a year and a half, Shivaji University flourished | दीड वर्षानंतर शिवाजी विद्यापीठ गजबजले

दीड वर्षानंतर शिवाजी विद्यापीठ गजबजले

Next

कोरोनामुळे शासन आदेशानुसार गेल्यावर्षी मार्चच्या अखेरीस विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अवघ्या पाच टक्क्यांवर आली. जूनच्या दरम्यान ती २० टक्के, तर ऑक्टोबरपासून ती ५० टक्के झाली. यावर्षी मार्चपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने २५ टक्के उपस्थितीवर विद्यापीठातील प्रशासकीय, अधिविभागांतील कामकाज करण्यात येऊ लागले. रोटेशन पद्धतीने अधिकारी, कर्मचारी कामावर येत होते, तर शिक्षकांनी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने सुधारित आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थिती सोमवारपासून सुरू झाली. सकाळी साडेदहा वाजता अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आपापल्या विभागांमध्ये आले. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर या कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत त्यांनी काम केले. या शंभर टक्के उपस्थितीमुळे विद्यापीठ परिसर गजबजून गेला.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

शिक्षक : २१०

अधिकारी, कर्मचारी : ४१७

फोटो (०६०९२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ, ०१) : तब्बल दीड वर्षानंतर सोमवारी शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीने शिवाजी विद्यापीठ गजबजून गेले. आस्थापना विभागाचे पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले. (छाया : नसीर अत्तार)

060921\06kol_11_06092021_5.jpg~060921\06kol_12_06092021_5.jpg

फोटो (०६०९२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ, ०१) : तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारी शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीने शिवाजी विद्यापीठ गजबजून गेले. आस्थापना विभागाचे पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (०६०९२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ, ०१) : तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारी शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीने शिवाजी विद्यापीठ गजबजून गेले. आस्थापना विभागाचे पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: After a year and a half, Shivaji University flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.