‘एव्हीएच’ विरोधात पुन्हा एल्गार

By admin | Published: January 31, 2015 12:24 AM2015-01-31T00:24:19+5:302015-01-31T00:24:39+5:30

आंदोलन चिघळणार : पदाधिकारी देणार राजीनामे, पाटणे फाटा येथील आंदोलनात निर्णय

Again against 'AVH' Elgar | ‘एव्हीएच’ विरोधात पुन्हा एल्गार

‘एव्हीएच’ विरोधात पुन्हा एल्गार

Next

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झालेल्या एव्हीएच केमिकल्स कंपनीविरोधात गेले वर्षभर थंड असलेल्या आंदोलनाने आज, शुक्रवारी पुन्हा उभारी घेतली. एव्हीएच विरोधात आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन तीव्र करण्यासाठी येत्या आठ दिवसांत शाळा-महाविद्यालये बंद ठेवणार व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदींनी राजीनामे देऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले.
सर्वपक्षीय बैठकीत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक राज्याने या एव्हीएच प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. मात्र, आमच्या सरकारने या माणसे मारणाऱ्या प्रकल्पाला परवानगी देऊन तो चंदगडकरांच्या माथी मारला. याला येथील जनतेचा कालही विरोध होता आणि आजही राहणार व भविष्यातही विरोध राहणार असल्याचे सांगितले.
डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी यावेळी चंदगडच्या जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एव्हीएच प्रकल्पाचे उत्पादन जनतेच्या जिवावरच दोन वर्षे थोपवून धरले आहे. मात्र, पैशाने माणसं फोडणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाला जनरेट्यामुळे कंपनी बंदच करावी लागेल. एव्हीएच बंद करण्यासाठी शेवटचा लढा गट-तट न ठेवता लढुया, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संग्राम कुपेकर, माजी सरपंच अरुण पाटील, रामराजे कुपेकर, अ‍ॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील, सुरेशराव चव्हाण-पाटील, भाऊ गडकरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सरपंच शिवाजी तुपारे, देवाप्पा बोकडे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, एम. जे. पाटील, बी. डी. पाटील, संजय पाटील, जानबा कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Again against 'AVH' Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.