पुन्हा रुग्णसंख्या, मृत्युसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:48+5:302021-06-23T04:17:48+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मृत्युसंख्येतही वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मृत्युसंख्येतही वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १२४९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३९ जणांचा मृत्यू झाला. १५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ हजार ९१३ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोल्हापूर शहरात २७३, करवीर तालुक्यात १८४, तर हातकणंगले तालुक्यात १६६ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १४ मृत्यू असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात सातजणांचा मृत्यू झाला आहे.
ही रुग्णसंंख्या वाढती असली तरी चाचण्या वाढल्या असताना तुलनेत नागरिक पॉझिटिव्ह येण्याचे आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही घटत असल्याचे चित्र आहे.
चौकट
सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात
कोल्हापूर १४
घोरपडे गल्ली शाहूपुरी, कदमवाडी, शिवाजी पेठ, नागाळा पार्क, आझाद गल्ली, साळाेखेनगर, कोल्हापूर, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, राजारामपुरी, रामानंदनगर, अंबाई टॅंक, न्यू शाहूपुरी, कसबा बावडा
हातकणंगले ०७
हेर्ले २, पेठवडगाव २, किणी, टोप, तासगाव
कागल ०३
वाळवा, रणदिवेवाडी, कसबा सांगाव
करवीर ०२
गडमुडशिंगी, कुडित्रे
शिरोळ ०२
शिरोळ, नवे दानवाड
गडहिंग्लज ०२
कडगाव, भडगाव
राधानगरी ०१
घोटवडे
इचलकरंजी ०१
पन्हाळा ०१
माले
इतर ०४
सांगली, निपाणी, एरंडोली, आकूर