वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या कागलमधील एजंटास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:36 PM2019-01-17T19:36:34+5:302019-01-17T19:38:10+5:30
वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाºया कागल येथील एजंट संशयित संतोष ऊर्फ सॅँडी आनंदराव पाडेकर (वय ३०, रा. अनंत रोटो, एकतानगर) याला पोलिसांनी बुधवारी (दि. १६) रात्री पकडले.
कोल्हापूर : वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाºया कागल येथील एजंट संशयित संतोष ऊर्फ सॅँडी आनंदराव पाडेकर (वय ३०, रा. अनंत रोटो, एकतानगर) याला पोलिसांनी बुधवारी (दि. १६) रात्री पकडले.
ही कारवाई प्रवासी लॉजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून केली. पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. संशयित पाडेकरकडून मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असा सुमारे ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी सांगितले की, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शिकार बिल्डिंग व यादव यांच्या बंद पेट्रोलपंपाच्या मधून प्रवासी लॉजकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेल्या पाडेकरला पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातील पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंदराव गोडसे, रवी गायकवाड, आनंदराव पाटील, वैशाली पिसे, जयश्री पाटील, माधवी घोडके, आदींनी केली.