अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:22 PM2018-09-03T13:22:42+5:302018-09-03T13:24:34+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आज, सोमवारपासून सुरू होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी दिली.
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आज, सोमवारपासून सुरू होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी दिली.
राज्य सरकारने थकीत मानधनासाठी आवश्यक बजेटची तरतूद केल्याने आंदोलन स्थगित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सेविका व मदतनीस यांचे केंद्र सरकारचे मानधन न आल्याने राज्य सरकारने आपले मानधन थकविले होते. अद्याप केंद्र सरकारचा निधी मिळाला नसला तरी राज्य सरकारला मानधन वाटपाची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक बजेटही मंजूर झाले आहे.
गणेशचतुर्थीपूर्वी मानधन खात्यावर जमा करू, अशी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आज, सोमवारपासून राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले असून, सेविका व मदतनीस यांनी आपले कामकाज करावे, असे आवाहन सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी पत्रकातून केले आहे.