आरोग्यसेवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:40 AM2020-11-20T10:40:16+5:302020-11-20T10:41:34+5:30
cprhospital, kolhapurnews राजषीॅ छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सवोॅपचार रुग्णालय येथील कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी स्थगित करण्यात आले. नूतन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी आंदोलनाची दखल घेऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच आवश्यक प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
कोल्हापूर : राजषीॅ छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सवोॅपचार रुग्णालय येथील कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी स्थगित करण्यात आले. नूतन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी आंदोलनाची दखल घेऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच आवश्यक प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) आणि गुरुवारी आंदोलन केले. नूतन प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे हे कार्यभार स्वीकारण्यासाठी आले असता कार्यालयासमोर त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रथम भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. कार्यभार स्वीकारताच तत्काळ त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संस्था स्तरावरील प्रलंबित प्रशासकीय मागण्या व समस्या आहेत त्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासित करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आदेश दिले. अर्जित व किरकोळ रजा मिळण्यासाठी आदेशही दिले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधातील त्रुटी दूर करून अशा सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवानिवृत्त वेतन लागू करू अशी ग्वाही दिली. याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, बाळासाहेब कवाळे, रघुनाथ कोटकर, कृष्णा नाईक, सरचिटणीस संजय क्षीरसागर, चरणदास घावरे, सुधीर आयरेकर, राजेश वालेकर, गणेश आसगावकर, विश्वास पाटील, महेश पाटील, शिवाजी निकम, शरद कामत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.