सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या निषेधार्थ शुक्रवारी महामार्गावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:58+5:302021-03-18T04:23:58+5:30
वीज बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे. विरोध म्हणून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. याची तयारी व जनजागृती ...
वीज बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे. विरोध म्हणून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. याची तयारी व जनजागृती करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी घुणकीत बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोरोनाकाळात इतर राज्यांनी वीज बिल माफ केले. महाराष्ट्रातही कृषी पंपाची व घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली. मात्र, महावितरणने जनतेच्या तोंडाला पाने पुसली. यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने पंचगंगा पुलावर शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यासाठी शेतकरी व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, संपतराव पोवार,वारणा बँकेचे संचालक धोंडीराम सिद उपस्थित होते.
फोटो : १७ घुणकी राजू शेट्टी
ओळी : घुणकी येथे सक्तीच्या वीजबिल आकारणी विरोधी आंदोलनासंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी. सोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे.