रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:33+5:302021-02-24T04:25:33+5:30

रविकिरण पेपर मिलचे जवळपास ७० कामगार सर्वश्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. कंपनीने त्यांची ...

The agitation of Ravi Kiran Paper Mill workers continued on the fifth day | रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

Next

रविकिरण पेपर मिलचे जवळपास ७० कामगार सर्वश्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. कंपनीने त्यांची दखल घेतलेली नाही. कायम कामगारांना कंत्राटी करणे, शासकीय नियमाने देय असलेला महागाई भत्ता न देणे, शासकीय आदेश न पाळणे, बिहारमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन काम करणे आदी प्रकारचा अन्याय कंपनी करीत आहे. अखेर आनंद गणपती पारशे व सोमनाथ गोविंद गावडे (पार्ले) यांनी सर्व कामगारांतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्याला पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, जि. प. सदस्या विद्या पाटील, प्रा. एन. एस. पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, उपसरपंच पांडुरंग बेनके, प्रताप डसके, दयानंद देवण, राहुल पाटील, सरपंच विष्णू गावडे, तानाजी गडकरी, भिकू गावडे, अभय देसाई, परशराम पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.

फोटो ओळी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे रविकिरण पेपर मिलच्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. एका उपोषणकर्त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हलविताना अ‍ॅड. संतोष मळवीकर, पोलीस व उपोषणकर्ते.

क्रमांक : २३०२२०२१-गड-०१

Web Title: The agitation of Ravi Kiran Paper Mill workers continued on the fifth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.