कोल्हापूर जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून अग्निपथ भरती, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 02:38 PM2022-07-30T14:38:50+5:302022-07-30T14:39:17+5:30

या सैन्य भरतीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यातून युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता

Agneepath recruitment from November 22 in Kolhapur district, planning by district administration | कोल्हापूर जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून अग्निपथ भरती, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

कोल्हापूर जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून अग्निपथ भरती, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

Next

कोल्हापूर : अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूरमध्ये २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान सैन्य भरती होणार आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी शुक्रवारी केले.

या सैन्य भरतीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यातील अंदाजे ८० हजार युवक सहभागी होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या नियोजनासाठी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

यात मैदान, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची सोय, अग्निशमन, वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, आर्मी रिक्रुटींग ऑफिसचे संचालक कर्नल पाल, सहकारी, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर, सैन्य भरतीशी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Agneepath recruitment from November 22 in Kolhapur district, planning by district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.