महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी जागरूकता कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:13+5:302021-08-26T04:26:13+5:30

कोल्हापूर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, कराड या महाविद्यालयातील कृषिकन्या राधिका रमेश डवर हिने कृषी ...

Agricultural Awareness Program under Mahatma Phule Agricultural University | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी जागरूकता कार्यक्रम

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी जागरूकता कार्यक्रम

Next

कोल्हापूर:

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, कराड या महाविद्यालयातील कृषिकन्या राधिका रमेश डवर हिने कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अभ्यास दौऱ्यादरम्यान लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ऑनलाइन व होम टू होम पद्धतीने राबविण्यात आला. याव्दारे शेतकऱ्यांचे जीवनमान, सामाजिक, आर्थिक विकास व पिकासंदर्भात माहितीचा अभ्यास या निमित्ताने विद्यार्थी करत आहेत. आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर, सिंचनाचे महत्त्व, सेंद्रिय खताचे व खते कशी तयार करावीत व कशी वापरावीत, तसेच शेतीला उपयुक्त असणारे मोबाइल ॲप्स, मातीचे परीक्षण कसे करावे व परीक्षणाचे फायदे, शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाव्दारे पटवून दिले. वरील प्रात्यक्षिके तिने भगवान वसंत तोडकर व कुंथिनाथ शांतीनाथ वर्धमाने यांच्या शेतावर घेण्यात आली.

या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय , कराड महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र आर. सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. धनजंय एस. नावडकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना एस. ताठे मॅडम, केंद्रप्रमुख डॉ. उल्हास एम. बोरले ए. आर. एस. कराड, प्रा.डॉ. आनंद चवई यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Agricultural Awareness Program under Mahatma Phule Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.