शेतीपूरक व्यवसायांना वीजबीलात सवलत मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:51+5:302021-02-13T04:23:51+5:30
: कोविड सेंटर बंद आजरा : शेतीपूरक व्यवसायांना वीजबील सवलत मिळावी, आवंडी व चितळे धनगरवाड्यांवर अंगणवाडी इमारतीसाठी निधी मिळावा, ...
: कोविड सेंटर बंद
आजरा : शेतीपूरक व्यवसायांना वीजबील सवलत मिळावी, आवंडी व चितळे धनगरवाड्यांवर अंगणवाडी इमारतीसाठी निधी मिळावा, असा ठराव आजरा पं. स. च्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. आजरा पंचायत समितीची सभा शुक्रवारी सभापती उदयराज पवा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजऱ्यातील कोविड सेंटर शुक्रवारपासून बंद केले असून कोरोना तपासणीसाठी यापुढे गडहिंग्लजला जावे लागणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनावणे यांनी सांगितले. कृषीचे वीज बिल भरण्यासाठी मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तालुक्यातील ४६०० शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी यांनी केले. शेतीपंपाबरोबर शेतीपूरक व्यावसायिकांना वीज बिल सवलतीचा लाभ मिळावा, अशा मागणीचा ठराव सदस्या रचना होलम यांनी मांडला. सर्व सदस्यांनी त्याला मंजुरी दिली.