शेती सेवा केंद्रे सुरू राहावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:16+5:302021-05-15T04:23:16+5:30

म्हाकवे : कोल्हापूर जिल्ह्यात भाताची पेरणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू केली जाते. २४ मे रोजी हे नक्षत्र सुरू होते; ...

Agricultural service centers should continue | शेती सेवा केंद्रे सुरू राहावीत

शेती सेवा केंद्रे सुरू राहावीत

Next

म्हाकवे : कोल्हापूर जिल्ह्यात भाताची पेरणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू केली जाते. २४ मे रोजी हे नक्षत्र सुरू होते; तर अनेक शेतकरी सोयाबीनचीही पेरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून करतात; परंतु, लॉकडाऊनमुळे शेतीसेवा केंद्रेही बंद करण्यात येणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना बियाणे, औषधे खरेदी करणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन ही केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गतवर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये ही शेती सेवा केंद्रे वगळली होती. मात्र, यंदा ऐन खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावरच केलेल्या लॉकडाऊनमध्ये या केंद्रांनाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बियाणे खरेदी कोठे करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

विक्रेत्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनीही कृषी अधिकाऱ्यांसह वरिष्ठांशी भेटी घेतल्या आहेत. मात्र, वरिष्ठांनी असमर्थता दर्शविली आहे.

दरम्यान, ऊसभरणीचा हंगामही अद्याप सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची शेतकऱ्यांना गरज भासत आहे. ऐन हंगामात ही शेतीसेवा केंद्रे पूर्णतः बंद न करता रोज सकाळी सुरू ठेवावीत, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना केली.

कोट..

संकरित आणि नवनवीन बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांना शेती केंद्रांवरच अवलंबून राहावे लागते. ही केंद्रे बंद राहिली तर शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन ही दुकाने रोज काही वेळ खुली ठेवण्यात यावीत.

- अमर पाटील

शेतकरी, बानगे

Web Title: Agricultural service centers should continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.