लेखी आश्वासनानंतर शेतमजुरांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:53+5:302020-12-11T04:52:53+5:30
संजय गांधी योजनेसह अन्य लाभार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व प्रशासनाची बैठक झाली. जिल्हा बँकेव्यतिरिक्त अन्य ...
संजय गांधी योजनेसह अन्य लाभार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व प्रशासनाची बैठक झाली. जिल्हा बँकेव्यतिरिक्त अन्य बँक व पोस्टामधून अनुदान देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. बँकेत पासबुक भरून देण्याबाबत शिरोळ, जयसिंगपूर येथील शाखाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय पेन्शनर लाभार्थ्यांशी सौजन्याने बोलण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन रक्कम करण्याबाबत बँकेच्या सर्व शाखांना यादी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश सासने, नायब तहसीलदार संजय काटकर, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक हेरवाडे, ए. डी. पाटील, विश्वास बालिघाटे, महावीर मगदूम, अब्दुलकादर मुजावर, मौला मुजावर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ०९१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.