शेतीची विद्युत जोडणी लवकरच सुरू करणार -अभियंता अंकुर कावळे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:33+5:302021-09-03T04:24:33+5:30
जयसिंगपूर विभागातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात ३ हजार ९४४ विद्युत पोल व डीपी जमीनदोस्त झाल्या होत्या. नदीकाठची शेती ...
जयसिंगपूर विभागातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात ३ हजार ९४४ विद्युत पोल व डीपी जमीनदोस्त झाल्या होत्या. नदीकाठची शेती वाळली असून नवीन पोल उभा करणे, जुने पोल काढणे, नवीन डीपी बसविणे, तुटलेल्या वायर जोडणे, विद्युत पुरवठा करणे यांसह कामाला गती आली आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतून पोल व इतर विद्युत साहित्य साहित्याची त्यांनी जिल्ह्यासाठी तातडीने व्यवस्था केली आहे. बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्युत ठेकेदार व मजूर बोलावण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर दुरस्तीचे काम गतीने सुरू असून पुढील दहा ते बारा दिवसांत शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या वेळी उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे, शाखा अभियंता शशिकांत माने, वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश लाळे, विरभद्र बसापुरे, राजू भानुसे, वर्षा कराळे, ठेकेदार बाळासाहेब मुळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - चिंचवाड (ता. शिरोळ) येथे विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्तीची पाहणी करताना महावितरणचे कार्यकारी अभियंता अंकुर कावळे, अधिकारी व कर्मचारी (छाया : अजित चौगुले, उदगाव)