हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने किणी येथे कृषी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:08+5:302021-07-02T04:17:08+5:30

किणी : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करावी. त्याचप्रमाणे दूग्ध, मrस्य व्यवसायासह शेतीपूरक व्यवसाय करावा ...

Agriculture Day at Kini on behalf of Hatkanangle Panchayat Samiti | हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने किणी येथे कृषी दिन

हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने किणी येथे कृषी दिन

Next

किणी : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करावी. त्याचप्रमाणे दूग्ध, मrस्य व्यवसायासह शेतीपूरक व्यवसाय करावा त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या नवीन योजना राबविण्यात येतात. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी केले.

हातकणंगले पंचायत समिती व कृषी हातकणंगले तालुका विभागाच्या वतीने किणी येथील प्रगतशील शेतकरी बाळगोंडा पाटील यांच्या शेताच्या बांधावर कृषिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी २०१८-१९ खरीप हंगामातील सोयाबीन पीक स्पर्धेत राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळालेल्या माजी सरपंच बाळगोंडा पाटील (किणी), २०२० खरीप हंगामात सोयाबीन पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर सारिका वसंत पाटील, (लाटवडे) तृतीय क्रमांक भाऊसाहेब दादा पाटील, (आळते) चतृर्थ क्रमांक रमेश बाबगोंड पाटील (किणी), तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आनंदा हरिभाऊ मसुरकर (पट्टणकोडोली), द्वितीय क्रमांक बाजीराव पाडुरंग पाटील (लाटवडे), तृतीय क्रमांक भीमराव नानासो देसाई (पाडळी), तानाजी रघुनाथ पाटील (पाडळी) विजेत्या शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

संजय पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रगतशील शेतकरी सुरेश पाटील अभिजात पाटील, राहुल माळी, अमोल चव्हाण, शुभम चव्हाण, सुमित दणाणे यांचा सत्कार आला. सेवानिवृत्त कृषितज्ज्ञ एस. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, कृषी अधिकारी अभिजित घोरपडे, उपसरपंच अशोक माळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. टी. पंडित, विस्तार अधिकारी, कृषी सहायक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी कार्वेकर संतोष पाटील यांनी केले. आभार कृषी अधिकारी एस. बी. देशमुख यांनी मानले.

०१ किणी कृषी दिन

किणी येथे कृषिदिनाच्या निमित्ताने पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बाळगोंडा पाटील याचा सत्कार पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुष्पा आळतेकर, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, उपसरपंच अशोक माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Agriculture Day at Kini on behalf of Hatkanangle Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.