राधानगरीत शेतीची झाली दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:11+5:302021-07-27T04:24:11+5:30
तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी महसूल विभागाकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, पाटबंधारे विभागाकडील नोंदीनुसार राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणाच्या परिसरात ...
तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी महसूल विभागाकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, पाटबंधारे विभागाकडील नोंदीनुसार राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणाच्या परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण क्षेत्रात आजपर्यंत २,८२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यापैकी चौदाशे मिलिमीटर पाऊस मागील सात दिवसात झाला आहे.
महापुराचा फटका भोगावती परिसरासह धामोड परिसराला जास्त बसला आहे. भोगावती तीरावरील कसबा तारळे, शिरगाव ते राशिवडे या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात व फूल शेतीचे जास्त नुकसान झाले आहे. शेतात असणाऱ्या घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
२६ राधानगरी
राधानगरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.