अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य हे कृतिशीलतेचा वस्तुपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:51+5:302021-08-14T04:28:51+5:30
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ...
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या वाहिनीवर विशेष ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या, राजकारणी धुरंधर होत्या. मात्र, सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. त्यांच्या जहागिरीत धान्याची कोठारे भरलेली असायची. मात्र, सर्व प्रजा जेवल्याची खात्री झाल्याखेरीज त्या स्वतः अन्नग्रहण करीत नसत. त्यांचा खजिना सोन्या-चांदीने भरलेला असला तरी त्यांच्या स्वतःच्या अंगावर मात्र स्फटिकाच्या माळेशिवाय अन्य दागिना नसे. संस्कृती रक्षणासाठी त्यांनी देवळांना संरक्षण पुरविले. काशीहून रोज पाण्याची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करताना त्या जोडीनेच त्यांनी टपाल पाठविण्याची व्यवस्थाही विकसित केली. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार व संरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे माजी मंत्री डांगे यांनी सांगितले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. एम.टी. गोफणे यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
नव्या पिढीने अनुकरणाची गरज
अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत समाजहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांनी घेतलेले आणि राबविलेले निर्णय अत्यंत मूलगामी, पथदर्शक स्वरूपाचे आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीने समजून घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत
130821\13kol_4_13082021_5.jpg
फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत)