आधार नसलेल्या दीपिका मांडवकरांच्या शस्त्रक्रियेसाठी हवा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:13+5:302021-03-13T04:45:13+5:30

कदमवाडी : पती व्यसनाधीन असल्याने त्याचा हात सोडून त्या बडोद्याहून ९ वर्षापूर्वी माहेरी कोल्हापुरात आल्या. मात्र, माहेरच्या माणसांचे प्रेमही ...

Air helping hand for Deepika Mandavkar's surgery without support | आधार नसलेल्या दीपिका मांडवकरांच्या शस्त्रक्रियेसाठी हवा मदतीचा हात

आधार नसलेल्या दीपिका मांडवकरांच्या शस्त्रक्रियेसाठी हवा मदतीचा हात

Next

कदमवाडी : पती व्यसनाधीन असल्याने त्याचा हात सोडून त्या बडोद्याहून ९ वर्षापूर्वी माहेरी कोल्हापुरात आल्या. मात्र, माहेरच्या माणसांचे प्रेमही नियतीने त्यांना जास्त काळ मिळू दिले नाही. आई-वडील, भाऊ, बहीण, भावजया ही सगळीच जिवाभावाची नाती देवाघरी गेल्याने एकलकोंडे आयुष्य त्यांच्या पदरी आले. मात्र, याही स्थितीत यात्रा-सहलींमध्ये आचारी बनून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दीपिका मांडवकर दोन वर्षांपूर्वी पाय घसरुन पडल्याने त्या घरातच जागीच खिळून आहेत. त्यामुळे आधार नसलेल्या दीपिकांच्या शस्त्रक्रियेसाठी दानशूरांच्या मदतीची गरज आहे. कसबा बावड्यातील लाईन बझारमध्ये राहणाऱ्या दीपिका मांडवकर यांच्यावर खुब्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्च येणार आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दीपिका या मूळच्या कोल्हापूरमधील लाईन बझारच्या. त्यांचे लग्न बडोद्याच्या दिलीप मांडवकर यांच्याशी १९९५ मध्ये झाले होते. लग्नाआधी आई वारली. त्यानंतर वडिलांचे निधन झाले. पती व्यसनाधीन असल्याने २०११ मध्ये त्या कोल्हापूरला आल्या. या काळात भाऊ,भावजया, बहीण यांचेही निधन झाले. त्यामुळे त्यांना कोणाचाच आधार उरला नाही. यात्रा -सहलींमध्ये आचाऱ्याचे काम करून त्या आपला गाडा हाकत होत्या. त्यातच २०१८ मध्ये पाय घसरुन पडल्याने त्यांच्या खुब्याला मार लागला. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड झाले. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च येणार असून तो त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे दानशूरांनी पुढाकार घेऊन शस्त्रक्रियेसाठी मदत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 'बँक ऑफ इंडिया’च्या बावडा शाखेतील 09031010018325 या खाते क्रमांकावर मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो ओळ

दीपिका मांडवकर याच्यावर सध्या कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (छाया-दीपक जाधव)

Web Title: Air helping hand for Deepika Mandavkar's surgery without support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.