मुरगूड शहरात हवेची गुणवत्ता तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:22 AM2021-01-02T04:22:15+5:302021-01-02T04:22:15+5:30
आता फेब्रुवारी व मार्च २०२१ या महिन्यात मुरगूड शहरातील रहिवासी, व्यापारी आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्र या प्रमुख तीन ठिकाणी ...
आता फेब्रुवारी व मार्च २०२१ या महिन्यात मुरगूड शहरातील रहिवासी, व्यापारी आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्र या प्रमुख तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. मुरगूड शहरात प्रथमच अशा प्रकारे हवेची गुणवत्ता तपासणी होत आहे. त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक बाईक, सायकल आदींचा वापर करावा, तसेच घराच्या, इमारतीच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारावी. नवीन निर्माण होणारा कचरा उघड्यावर न टाकता ओला व सुका, घरगुती घातक कचरा याचे वर्गीकरण करून तो नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकावा, वृक्ष संवर्धनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
फोटो ओळ
मुरगूड, ता. कागल येथे शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणी करताना अधिकारी.