इच्छाशक्तीमुळेच उभारला जलसेतू
By admin | Published: January 2, 2015 09:55 PM2015-01-02T21:55:30+5:302015-01-02T21:55:46+5:30
प्रमोद कामत : शेर्लेवासीयांनी बांधला तेरेखोल नदीपात्रावर बंधारा
बांदा : गावाने एकजूट दाखविल्यास कोणतेही काम सहजशक्य होऊ शकते, हे शेर्लेवासीयांनी दाखवून दिले आहे. शेर्ले ग्रामस्थांनी इच्छाशक्तीच्या जोरावरच तेरेखोल नदीपात्रात जलसेतू उभारून शेर्लेवासीयांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी शेर्ले येथे केले.
शेर्ले ग्रामस्थांनी तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने बांधलेल्या जलसेतूच्या उद्घाटन समारंभात कामत बोलत होते. यावेळी शेर्लेचे माजी सरपंच युसुफखान बिजली यांच्या हस्ते फीत कापून जलसेतूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेर्ले सरपंच उदय धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, उन्नती धुरी, गुरुनाथ सावंत, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई, अन्वर खान, राजन कळंगुटकर, जगन्नाथ धुरी, हनुमंत आळवे, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, श्यामकांत काणेकर, आदी उपस्थित होते. बिजली यांनी या नदीपात्रावर पूल होण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या पुलाचा प्रश्न रखडला होता. अखेर शेर्लेवासीयांनीच श्रमदानाने बंधारा उभारला. प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकनाथ धुरी, पोलीस पाटील विश्राम जाधव, रवी आमडोसकर, दयानंद धुरी, भिकाजी धुरी, शेर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलाकर नेवगी, जयवंत धुरी, संदेश पावसकर, शेखर गोवेकर, श्रीपाद पणशीकर, शशिकांत मळेवाडकर, लक्ष्मण जाधव, नंदू कल्याणकर, राजेश चव्हाण, अरुण धुरी, अजित शेर्लेकर, आनंद चव्हाण, आना धुरी, दीपक गोवेकर, अमित गोवेकर यांच्यासह शेर्ले व बांदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरेखोल नदीपात्रावर बंधारा बांधण्यात आल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)