‘विमानतळा’चे अडथळे महिन्यात होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:54 AM2019-11-17T00:54:14+5:302019-11-17T00:56:58+5:30

विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल.

The airport barriers will be months away | ‘विमानतळा’चे अडथळे महिन्यात होणार दूर

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी विमानतळ विकासकामांसंदर्भातील बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सतेज पाटील, चंद्रकांत जाधव, सागर म्हारुळकर, सतीश गुप्ता, अनंत शेखर आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देदर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेणार । सतेज पाटील जिल्हाधिकारी । विमानतळ विकासकामांसंदर्भात बैठक ।

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे हे महिन्याभरात दूर केले जातील. प्रशासन पातळीवरील कामे महिन्यात, तर शासनपातळीवर निधीसाठी प्रस्तावित असलेली कामे निधी प्राप्त झाल्यानंतर सुरू केली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. तर विमानतळासंदर्भातील अडचणी व तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान उद्या, सोमवारी विमानतळ येथे संयुक्त पाहणी करण्याबाबतही यावेळी ठरले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विमानतळ प्राधिकरणचे महाप्रबंधक (सिव्हील विभाग) सतीश गुप्ता, उपमहाप्रबंधक अनंत शेखर, वरिष्ठ प्रबंधक पूजा मूल, ए. एम. वेणू, प्राधिकरणचे सल्लागार समिती सदस्य तेज घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर म्हारुळकर, एस. एल. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, राजू माने, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करावी, असे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवत संयुक्त पाहणी करण्याचे ठरले. विमानतळासंदर्भातील काही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अजून नवीन जमीन संपादनाचे विषय आहेत. सध्या टर्मिनल इमारतीचे सुरू असलेले काम, तसेच कामे कोणत्या पातळीवर सुरू असून कुठे थांबली आहेत याचा आढावा घेतला जाईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी येथील मंदिर स्थलांतर करण्याची प्रक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा करून पंधरा दिवसांत करण्यात येईल. महावितरणकडे आॅप्टिकल लाईटस् लावण्याचा १४ लाखांचा प्रस्ताव असून, त्याचे पैसे त्यांच्याकडे जमा केले आहेत. त्यानुसार महावितरणने पंधरा दिवसांत या लाईटस् लावण्याचे मान्य केले. विस्तारीकरणासाठी आणखी ६४ एकर अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव असून, त्याचा सर्व्हे व मार्किंग करून अंतिम प्रस्ताव प्राधिकरणकडे पाठविला जाईल. विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल.


डिसेंबरअखेर दिशादर्शक फलक लागणार
विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक केव्हा लागणार? अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी सार्वजनिक बांधकामचे भोसले यांना केली. यावर टेंडर प्रक्रिया
झाली असून, जानेवारीअखेर फलक लावले जातील, असे त्यांनी सांगितले. पैसे मंजूर असतील तर इतका उशीर का? अशी विचारणा पाटील यांनी केल्यावर डिसेंबरअखेर हे फलक लावू, असे आश्वासन भोसले यांनी दिले.


विमानतळासाठी गुरुवारपासून ‘केएमटी’
विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुरुवार (दि. २१)पासून केएमटी बस सुरू करण्यात येणार आहे. ही बस कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. त्याचबरोबर विमानतळाकडे जाणाºया रस्त्यांवर असणारा कचरा उठाव करण्यासाठी उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.


विजेचे खांब, वाहिन्या, झाडे यांचे अडथळे
विजेचे खांब, वीजवाहिन्या यांचे अडथळे दूर करण्याबरोबरच झाडांचे अडथळे दूर करण्याला प्राधान्य देण्याबरोबरच परिसरातील इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांचे अडथळे काढण्यासाठी त्यांना पत्र दिले जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


 

Web Title: The airport barriers will be months away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.