राज्य खो-खो संघात रत्नागिरीची ऐश्वर्या
By admin | Published: February 1, 2015 09:08 PM2015-02-01T21:08:46+5:302015-02-02T00:08:15+5:30
केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती आता पूर्ण तयारीने उतरणार असल्याने अपेक्षित यश गाठू, असे सावंत हिने सांगितले.
रत्नागिरी : केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंत हिची राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. हा संघ खो-खो संघटनेतर्फे नुकताच जाहीर करण्यात आला.या स्पर्धेत पुरुष संघाचे कर्णधारपद सांगलीचे नरेश सावंत, तर महिला गटात अहमदनगरची श्वेता गवळी भूषविणार आहे. बेंगलुरु येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपद, तर पुरुष संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. ऐश्वर्या हिने यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश मिळविले आहे. केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती आता पूर्ण तयारीने उतरणार असल्याने अपेक्षित यश गाठू, असे सावंत हिने सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेतही या संघाची कामगिरी उत्तम होईल, असा विश्वास राज्य खो-खो संघटनेचे सचिव चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला खो-खो संघामध्ये श्वेता गवळी (अहमदनगर), कविता घाणेकर, पौर्णिमा सकपाळ, मीनल भोईर, शीतल भोर (सर्व ठाणे), सुप्रिया गाडवे, सारीका काळे (उस्मानाबाद), श्रुती सकपाळ, शिल्पा जाधव (मुंबई उपनगर), प्रियांका येळे (सातारा), ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), सोनाली मोकासे (नागपूर), जगदीश नानजकर (मार्गदर्शक - पुणे), चित्रा आगळे (व्यवस्थापीका - बीड) यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)