आजरा-आगाराची कोल्हापूर पुणेसह ८ शेड्युल व २३ फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:43+5:302021-06-25T04:18:43+5:30
आजरा आगारातून कोल्हापूर, पुणे मार्गावर प्रत्येकी दोन-दोन फे-या गडहिंग्लज मार्गावर प्रत्येक तासाला १ फेरी तर बेळगाव-नेसरी मार्गावर कोवाडपर्यंत ...
आजरा आगारातून कोल्हापूर, पुणे मार्गावर प्रत्येकी दोन-दोन फे-या गडहिंग्लज मार्गावर प्रत्येक तासाला १ फेरी तर बेळगाव-नेसरी मार्गावर कोवाडपर्यंत बसेस सोडल्या जात आहेत. दिवसभरात ३५ ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
कोल्हापूर-पुणे मार्गावरील बसेस माद्याळ कापशीमार्गे जात आहेत. त्यामुळे प्रवासी वर्ग कमी मिळत आहे. निपाणी मार्गे प्रवाशी वाहतूक सुरू झाल्यास तासाला एक बस सोडण्याचे नियोजन केले आहे. एस.टी.ने गावातून आणलेल्या लोकांना परत नेवून पोहोचवण्याची व्यवस्थाही केली आहे.
ग्रामीण भागातील लाटगाव, देवकांडगाव, घाटकरवाडी, एरंडोळ, दाभिल, किटवडे या मार्गावरही सोमवारपासून बससेवा तर कोल्हापूर मार्गावर एक तासाला बस सोडली जाणार आहे. त्याचेही नियोजन केले आहे.
सध्या आजरा आगारातून कोल्हापूर, पुणे व गडहिंग्लज मार्गावर प्रवासी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एस.टी.ची मालवाहतूक सेवाही सुरू आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर एस.टी.ची प्रवाशी सेवा पुन्हा पूर्वपदावर येत आहे.
प्रवासी वर्गाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आजरा आगाराचे सहायक कार्यशाळा अधिक्षक पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.