अजित पवार यांच्या वाढदिनी ‘दक्षिण राष्ट्रवादी’तर्फे छत्री वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:31+5:302021-07-23T04:16:31+5:30
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या वतीने गरजू भाजीपाला ...
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या वतीने गरजू भाजीपाला विक्रेते, फेरीवाले तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन १०० हून अधिक छत्रीचे वितरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांना तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी यांना आपला वाढदिवस डिजिटल फलक न लावता समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिसरातील भाजीपाला विक्रेते, फेरीवाले यांना पावसाळी छत्रींचे वितरण केले. सायबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन छत्री वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमास अध्यक्ष नितीन पाटील, दिलीप कलकुटकी, सुरेंद्र माने, रविंद्र मोरे, हरीश पाथरूट, अरुणा पाटील, कल्पना रांजगणेकर, विजय जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो नं. २२०७२०२१-कोल-एनसीपी०१
ओळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गरजू भाजीपाला विक्रेते, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन पाटील, दिलीप कलकुटकी, सुरेंद्र माने, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.
220721\22kol_4_22072021_5.jpg
ओळ : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त गुरुवारी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गरजू भाजीपाला विक्रेते, ज्येष्ठ नागरीकांना छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन पाटील, दिलीप कलकूटकी, सुरेंद्र माने, रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.