Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:09 PM2023-01-04T19:09:25+5:302023-01-04T19:16:56+5:30

सदाशिव मोरे आजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस आजरा बंद व शुक्रवार दिनांक ६ ...

Ajra shut down for three days in case of molestation of a minor girl, Janakrosh Morcha next Friday | Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा

Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा

googlenewsNext

सदाशिव मोरे

आजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस आजरा बंद व शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आज तहसिल कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बंद मागे घेवून शुक्रवारी ९ ते ११  यावेळेत जनआक्रोश मोर्चा काढून त्यानंतर आठवडा बाजार पूर्ववत सुरू करण्याचे ठरले होते. परंतू हा निर्णय अमान्य करीत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तीन दिवसाचा बंद, जनआक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम राहिले. यासर्व परिस्थितीमुळे आजरा शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

रात्रीच्या सुमारास  शहरातील एका हायस्कूलमधील स्नेहसंमेलनानिमित्त आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम पाहून अल्पवयीन मुलगी आपल्या पालक व मैत्रिणी सोबत घरी जात होती. दरम्यान काही तरुणांनी या मुलीची छेड काढली. ही घटना वाऱ्यासारखी आजरा शहरात पसरली. व वातावरण तणावपूर्ण बनले. 

संबंधित तरुणाला पकडून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनच्या दारात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री गर्दी केली होती. दरम्यान, तीन दिवस आजरा बंद व शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे आज दिवसभर आजरा शहरात तणावपुर्ण शांतता होती. बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजरा पोलिसांनी शहरातून संचलन करीत शांतता कमिटीची बैठक घेतली. मात्र यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने यावर तोडगा निघाला नाही.

Web Title: Ajra shut down for three days in case of molestation of a minor girl, Janakrosh Morcha next Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.