आजरा अर्बन बँकेला १५ कोटी ९५ लाखांचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:42+5:302021-04-02T04:25:42+5:30
येथील आजरा अर्बन बँकेला (मल्टी-स्टेट) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १५ कोटी ९५ लाखांचा विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. कोरोनाच्या ...
येथील आजरा अर्बन बँकेला (मल्टी-स्टेट) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १५ कोटी ९५ लाखांचा विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. कोरोनाच्या महामारीत जवळपास ६ महिने आर्थिक व्यवहार ठप्प असतानाही एन.पी.ए.चे प्रमाणदेखील १.६३ टक्के इतका राखला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व संचालक अशोक चराटी, बँकेचे अध्यक्ष सुरेश डांग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेने सन २०२०-२१ अखेर ६९० कोटींच्या ठेवी संकलित केल्या असून ४१७ कोटींची कर्जे वितरीत केल्या आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास ६ महिने आर्थिक व्यवहार ठप्प असतानादेखील बँकेच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या कालावधीतही १५ कोटी ९५ लाख इतका विक्रमी ढोबळ नफा मिळविला आहे.
बँकेने निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाणदेखील १.५३ टक्के इतके राखले आहे.
आजरा बँकेने प्रधानमंत्री आवास योजनेकरिता नॅशनल हाऊसिंग बँकेबरोबर करार केला आहे. यामुळे पात्र लाभार्थीने बँकेकडे संपर्क करावा. डिसेंबर महिन्यांपासून बँकेमध्ये आरटीजीएस, एनईएफटी ही थेट सेवा आयडीआरबीटी बरोबर केली आहे. यामुळे विनाविलंब पैसे जमा होण्याची सुविधा प्राप्त झाली आहे.
आयएफएससी कोड मिळाला आहे. येत्या वर्षभरात बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यासह गोवा राज्यात शाखा काढणार असल्याचेही यावेळी अशोक चराटी, सुरेश डांग यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा शैला टोपले, संचालक विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरूणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
------------------------------
* अशोक चराटी : ०१०४२०२१-गड-०७
* सुरेश डांग : ०१०४२०२१-गड-०८