रक्तदान शिबीरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 08:04 PM2021-07-09T20:04:09+5:302021-07-09T20:09:11+5:30

Lokmat Event Blood Donetion Kolhapur : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरात "मी रक्तदान करणार आपणही करा " असा तरुणांनी संदेश देत आपलं नातं लोकमतशी घट्ट व जिव्हाळ्याचे असल्याचे दाखवून दिले.

Ajrekar gave a good response to the blood donation camp | रक्तदान शिबीरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

आजऱ्यातील रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सभापती उदयदादा पवार, जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, तहसीलदार विकास अहिर, उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, मराठा महासंघाचे मारुती मोरे यासह मान्यवर उपस्थित होते. 

Next
ठळक मुद्दे आजऱ्यात ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान' मी रक्तदान करणार आपणही करा ' तरुणांनी दिला संदेश

सदाशिव मोरे

आजरा :  लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरात "मी रक्तदान करणार आपणही करा " असा तरुणांनी संदेश देत आपलं नातं लोकमतशी घट्ट व जिव्हाळ्याचे असल्याचे दाखवून दिले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. संपत खिल्लारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,सभापती उदय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमतचे आजरा तालुका प्रतिनिधी सदाशिव मोरे व वितरणचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील यांनी रक्तदान शिबिरासाठी उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांचे स्वागत केले.

शिबिर यशस्वी करणेसाठी तहसिलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, रवळनाथ केबल नेटवर्कचे रवींद्र नेवरेकर, भगवा रक्षक मंडळाचे वैभव सावंत, निवडणूक नायब तहसीलदार डी.डी. कोळी, गट विकास अधिकारी बी.डी.वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे, शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाचे नाथा देसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, बैतूलमाल कमिटीचे अध्यक्ष मंजूर मुजावर, टीम सतेजचे नौशाद बुढ्ढेखान, नगरसेवक किरण कांबळे, आजरा सूतगिरणीचे सचिन सटाले,मनसेचे आनंदा घंटे यांनी विशेष सहकार्य केले.

रक्तदान शिबीरास नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, महादेव पोवार,मायकेल फर्नांडिस, एस.पी.कांबळे, संभाजी इंजल, प्रकाश देसाई, सुनील शेवाळे, विलास रावजीचे, सचिन नांदवडेकर,मनीष टोपले, अजित हरेर, सुधीर कुंभार यासह मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे वितरण अधिकारी भाऊसाहेब पाटील, अवधूत पोळ, संग्राम पायमल, धनाजी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.


कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताची गरज पाहून लोकमतने रक्तदान शिबीर घेऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. लोकमतचे हे कार्य प्रेरणादायी आहे.
- तहसिलदार, 
 विकास अहिर, आजरा.


लोकमतने घेतलेल्या रक्तदान शिबीरातून गरजू व्यक्तींना निश्चित मदत होणार आहे. रक्तदानामुळे मित्राच्या पत्नीचा जीव वाचविण्याचा अनुभव असल्याने आज मी रक्तदान केले व सर्वांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले.
- किरण कांबळे, 
नगरसेवक


कोरोनाच्या भीषण संकटात अडचणीवर मात करीत आजरेकरांनी रक्तदान शिबीर यशस्वी केले. रक्तदानासाठी लोकमतने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.
- बालाजी भांगे, 
सहाय्यक पोलीस निरीक्षक


अभिजीतने ६५ वेळा केले रक्तदान..

आजरा अर्बन बँकेत नोकरीस असलेले व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत केसरकर यांनी आज लोकमतच्या रक्तदान शिबिरात ६५ वे रक्तदान करून एक वेगळा उच्चांक केला आहे. त्यांचा नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Ajrekar gave a good response to the blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.