रक्तदान शिबिरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:04+5:302021-07-10T04:17:04+5:30

आजरा : 'लोकमत'चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसील ...

Ajrekar gave a good response to the blood donation camp | रक्तदान शिबिरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

रक्तदान शिबिरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

Next

आजरा :

'लोकमत'चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात 'मी रक्तदान करणार, आपणही करा' असा तरुणांनी संदेश देत आपलं नातं लोकमतशी घट्ट व जिव्हाळ्याचे असल्याचे दाखवून दिले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, सभापती उदयदादा पवार यांच्याहस्ते करण्यात आले. 'लोकमत'चे आजरा तालुका प्रतिनिधी सदाशिव मोरे व वितरणचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील यांनी रक्तदान शिबिरासाठी उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांचे स्वागत केले.

शिबिर यशस्वीतेसाठी तहसीलदार विकास अहिर, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, रवळनाथ केबल नेटवर्कचे रवींद्र नेवरेकर, भगवा रक्षक मंडळाचे वैभव सावंत, निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाचे नाथा देसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष मंजूर मुजावर, 'टीम सतेज'चे नौशाद बुढ्ढेखान, नगरसेवक किरण कांबळे, आजरा सूतगिरणीचे सचिन सटाले, 'मनसे'चे आनंदा घंटे यांनी विशेष सहकार्य केले.

रक्तदान शिबिरास नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, महादेव पोवार, मायकेल फर्नांडिस, एस. पी. कांबळे, संभाजी इंजल, प्रकाश देसाई, सुनील शेवाळे, विलास रावजीचे, सचिन नांदवडेकर, मनीष टोपले, अजित हरेर, सुधीर कुंभार यांसह मान्यवर उपस्थित होते. 'लोकमत'चे वितरण अधिकारी भाऊसाहेब पाटील, अवधूत पोळ, संग्राम पायमल, धनाजी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताची गरज पाहून 'लोकमत'ने रक्तदान शिबिर घेऊन अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत केली आहे. 'लोकमत'चे हे कार्य प्रेरणादायी आहे.

विकास अहिर, तहसीलदार, आजरा.

चौकट :

'लोकमत'ने घेतलेल्या रक्तदान शिबिरातून गरजू व्यक्तींना निश्चित मदत होणार आहे. रक्तदानामुळे मित्राच्या पत्नीचा जीव वाचविण्याचा अनुभव असल्याने आज मी रक्तदान केले व सर्वांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले.

किरण कांबळे, नगरसेवक.

चौकट :

कोरोनाच्या भीषण संकटात अडचणीवर मात करीत आजरेकरांनी रक्तदान शिबिर यशस्वी केले. रक्तदानासाठी 'लोकमत'ने घेतलेला पुढाकार निश्चित कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.

- बालाजी भांगे, सहायक पोलीस निरीक्षक

चौकट :

अभिजीतने ६५ वेळा केले रक्तदान

आजरा अर्बन बँकेत नोकरीस असलेले व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत केसरकर यांनी आज 'लोकमतच्या रक्तदान शिबिरात ६५ वे रक्तदान करून एक वेगळा उच्चांक केला आहे. त्यांचा नगराध्यक्ष जोत्स्ना चराटी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

चौकट :

रक्त संकलन व प्रमाणपत्र..!

'लोकमत'च्या आजऱ्यातील रक्तदान शिबिरात केदारी रेडेकर रक्त साठवणूक केंद्र गडहिंग्लज व अर्पण रक्त केंद्र कोल्हापूर यांच्यातर्फे रक्त संकलन करण्यात आले. 'लोकमत'तर्फे प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

फोटो ओळी :

आजऱ्यातील रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, सभापती उदयदादा पवार, जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, तहसीलदार विकास अहिर, उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, मराठा महासंघाचे मारुती मोरे यांसह मान्यवर.

क्रमांक : ०९०७२०२१-गड-०६

फोटो ओळी :

'लोकमत'च्या रक्तदान शिबिरात ६५ वे रक्तदानप्रसंगी अभिजीत केसरकर यांचा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांच्याहस्ते सत्कार करताना.

क्रमांक : ०९०७२०२१-गड-०७

प्रतिक्रियासाठी फोटो

* विकास अहिर : ०९०७२०२१-गड-१०

* बालाजी भांगे : ०९०७२०२१-गड-०९

* किरण कांबळे : ०९०७२०२१-गड-०८

Web Title: Ajrekar gave a good response to the blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.