आकाश चेलानी, केव्हिन लालवाणी, केदार साळुंखे चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:03+5:302021-02-14T04:22:03+5:30
कोल्हापूर : विबग्योरचे आकाश चेलानी, केव्हिन लालवानी आणि केदार साळुंखे यांनी क्रीडा पुरस्कार जिंकला असून, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय विक्रम ...
कोल्हापूर : विबग्योरचे आकाश चेलानी, केव्हिन लालवानी आणि केदार साळुंखे यांनी क्रीडा पुरस्कार जिंकला असून, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय विक्रम पुस्तकामध्ये झळकले आहे. देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी त्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांनी भारतात अनेक सन्मानही मिळवले आहेत.
आकाश चेलानी चौथीमधील विद्यार्थी असून, त्यांने पहिलीपासूनच इंग्रजी, विज्ञान, सामान्यज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान या विषयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकली आहे. तीनवेळा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आकाशची रोलर स्केटिंगमध्ये ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. ‘ग्लोबल किडस् अचिव्हर्स अवाॅर्ड २०२०’देखील त्याने जिंकले आहे.
केव्हिन लालवानी हा आठवीत शिकत आहे. एएसईईटी टॅलेंट सर्च (एटीएस) गोल्ड स्कॉलर आहे. बुद्धीबळ, पोहणे आणि फुटबॉलमध्ये त्याने बक्षिसे जिंकली आहेत. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि स्केटिंगसाठी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये त्याची नोंद झाली आहे. केदार साळुंखे हा तिसरीमध्ये आहे. केदार स्केटिंग चॅम्पियन असून, त्याला क्रीडा पराक्रमासाठी असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. ‘डायऑस ऑफ एशिया चेन्नई’तर्फे ‘डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स’ने त्यांचा सन्मान केला आहे. ‘डायव्हस ऑफ युनिव्हर्सल युनिटी’ने त्यांना ‘युनिव्हर्सल ॲम्बेसेडर कल्चरल’ म्हणूनही निवडले आहे.
फोटो : १३०२२०२१-कोल-विबग्योर या नावांने