जमिनीच्या सात बारावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच; तलाठ्यास इचलकरंजीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 12:07 PM2021-11-18T12:07:13+5:302021-11-18T12:07:51+5:30

इचलकरंजी : बँकेच्या कर्जाचा बोजा जमिनीच्या सात बारावरून कमी करून देण्यासाठी सात हजाराची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलास- ...

Alas Bubnal arrested in Ichalkaranji along with Talati in bribery case | जमिनीच्या सात बारावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच; तलाठ्यास इचलकरंजीत अटक

जमिनीच्या सात बारावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच; तलाठ्यास इचलकरंजीत अटक

googlenewsNext

इचलकरंजी : बँकेच्या कर्जाचा बोजा जमिनीच्या सात बारावरून कमी करून देण्यासाठी सात हजाराची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलास- बुबनाळचा तलाठ्यासह इचलकरंजीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गजानन आप्पासो माळी (वय ४६, रा.शिवाजीनगर, इचलकरंजी) असे या तलाठ्याचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी इचलकरंजी नगरपालिकेत दोघांना लाच घेतांना रंगेहात जेरबंद करण्यात आले होते.

याबाबतची माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांनी एक महिन्यापूर्वी पाच एकर सात बा-यावर नोंद केलेले जयसिंगपूर उदगाव बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी योग्य कागदपत्रांसह आलास तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या मित्रास तलाठी माळी याला भेटण्यासाठी पाठवले. त्यावेळी माळी याने दहा हजार लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार पथकाने ३ नोव्हेंबर रोजी दोन पंचासमक्ष इचलकरंजीतील कॉंग्रेस भवनजवळ लाच मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये तडजोडीअंती सात हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु माळी याला कुणकुण लागल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु पडताळणीत मागणी स्पष्ट झाल्याने गुरुवारी तलाठी माळी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

Web Title: Alas Bubnal arrested in Ichalkaranji along with Talati in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.