पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रात पर्यटकांची दारूपार्टी, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 01:47 PM2022-07-24T13:47:45+5:302022-07-24T13:49:05+5:30
व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी रंगल्याची घटना समोर आली. या पार्टीचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. किल्ले पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये काही महिला देखील असल्याचे दिसून आले.
पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रात पर्यटकांची दारूपार्टी, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण#Kolhapurpic.twitter.com/L0xrhxSlAK
— Lokmat (@lokmat) July 24, 2022
महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्यानं पडझड होत आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. यापूर्वीही मागील वर्षी त्या ठिकाणी बुरूज ढासळल्याची घटना घडली होती.