दारूच्या नशेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:35+5:302021-02-15T04:22:35+5:30
पोलिसांतून मिळालेली महिती अशी, गोगवे येथील तानाजी माने यांचे पळस मानी नावाच्या शेतात गुऱ्हाळ आहे. राजाराम ...
पोलिसांतून मिळालेली महिती अशी, गोगवे येथील तानाजी माने यांचे पळस मानी नावाच्या शेतात गुऱ्हाळ आहे. राजाराम खोत हा दोन वर्षांपूर्वी माने यांच्याकडे गुऱ्हाळघरावर कामाला होता. सध्या राजाराम खोत कोतोली गावातील गुऱ्हाळावर कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते; तसेच त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू होते. त्याला कोतोली गुऱ्हाळघरावर करमत नव्हते; त्यामुळे तो माने यांना मी तुमच्याकडे कामाला येतो, म्हणत असे; मात्र माने यांचे गुन्हाळ संपत आले होते. त्यामुळे त्यांनी त्याला कामास नकार दिला. शुक्रवारी (दि. १२) दुपारी माने यांचे गुन्हाळ सुरू होते. दुपारी एक कामगार काईलीवर रहाट मारत असताना अचानक राजाराम खोतने दारूच्या नशेत धावत येऊन उकळत्या काहिलीत उडी घेतली. जवळ असणाऱ्या कामगाराने आरडाओरडा करताच जवळ असणाऱ्या कामगारांनी जमा होऊन काहिलीतून राजाराम खोत याला बाहेर काढून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुऱ्हाळमालक कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. या घटनेची त्यांना कल्पना देण्यात आली. मृताचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला . राजाराम खोत याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.