आळवेतील गुरुजी देत आहेत इंधन बचतीचा संदेश

By admin | Published: May 30, 2017 12:28 AM2017-05-30T00:28:38+5:302017-05-30T00:28:38+5:30

दररोज बारा किलोमीटरचा प्रवास : गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे सायकलचा वापर

Alive Guruji is giving message of fuel savings | आळवेतील गुरुजी देत आहेत इंधन बचतीचा संदेश

आळवेतील गुरुजी देत आहेत इंधन बचतीचा संदेश

Next

विक्रम पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क  -करंजफेण : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, आरोग्य चांगले राखण्यासाठी व वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण राहण्यासाठी सायकलच्या वापराचा पर्याय योग्य मानला जात असला, तरी आज लोक फर्लांगभर जाण्यासाठीसुद्धा मोटारसायकलचा वापर करीत असल्याची वास्तवता समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चारचाकीची ऐपत असली तरी सायकलनेच आॅफिसला जाणारे लोक तुरळकच पाहायला मिळतात. त्यामधील एक उदाहरण म्हणजे मूळचे आळवे (ता. पन्हाळा) येथील जि. प.चे पदवीधर अध्यापक विलास आनंदा कुंभार हे ठरत आहेत.
मागील दहा वर्षांमागील चित्र पाहता सायकलला अनन्यसाधारण महत्त्व होते. सायकल म्हणजे प्रतिष्ठेची बाब समजली जात होती; पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आल्यामुळे सायकल संस्कृती मागे पडू लागली आहे. त्याचा मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या दृष्टीने व इंधन बचतीच्या बाजूने विचार केला असता शासनाला
जनजागृती करण्याची गरज भासू लागली आहे.
हा सर्व विचार आत्मसात करून १५ आॅगस्ट २००७ पासून कुंभार यांनी ठरवले की, आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी शाळेला सायकल घेऊन जायचे. नंतर त्यांनी नियमितपणे शाळेला सायकलवरून जायची सवय लावून घेतली. कारण सायकल चालविणे हा उत्तम प्रकारे व्यायाम आहे आणि एक पर्यावरणपूरक कृती
आहे. हे जरी खरे असले तरी
आॅफिसला सायकल घेऊन जाणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक हास्यास्पद बाब आहे याची जाणीव असूनदेखील त्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे सायकलने शाळेला जाण्याचे एक व्रतच अंगी जोपासले आहे.
त्यांच्या सेवेची सुरुवात १९९० साली भाडळे (ता. शाहूवाडी) या गावापासून झाली. सुरुवातीला ते मोटारसायकलचा वापर करत होते, परंतु त्यांच्या मनात विचार आला की, सायकल चालविणं एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे.
त्याबरोबरच एक पर्यावरणपूरक कृती आहे. तरी हे सर्व आपण पुस्तकी वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता आपल्यापासून आत्मसात करण्याची खरी गरज आहे.
त्यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये कोलोली, दिगवडे या ठिकाणी सेवा बजावताना सायकलची साथ सोडलेली नाही. आता ते करंजफेण (ता. पन्हाळा) या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावत असले तरी दररोजचा १२ कि.मी.चा प्रवास ते नियमितपणे सायकलनेच करत आहेत.


गेल्या नऊ वर्षांपासून मी प्रवासादरम्यान नियमित सायकलचा वापर करत आहे. त्यातून मला काहीही सिद्घ करायचे नव्हते अन् नाही, परंतु व्यायामातून मिळणारी सुखद अनुभूती मला अनुभवायला मिळत आहे. त्याबरोबर पर्यावरण उपक्रमात प्रदूषण व इंधन बचतीसाठी आपला थोडा का असेना सहभाग असल्याने मला मोठा अभिमान वाटत आहे.
- विलास कुंभार

Web Title: Alive Guruji is giving message of fuel savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.