क्षारपडमुक्त प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:32+5:302021-02-11T04:25:32+5:30
दानोळी : क्षारपडमुक्त जमिनीचा व निचरा प्रणालीची क्रांती हा संदेश सर्व जगाला आज शिरोळ तालुक्याने दिला आहे. ही प्रणाली ...
दानोळी : क्षारपडमुक्त जमिनीचा व निचरा प्रणालीची क्रांती हा संदेश सर्व जगाला आज शिरोळ तालुक्याने दिला आहे. ही प्रणाली शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरत आहे, असे प्रतिपादन कसबे डिग्रजचे जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी कृषी संशोधन केंद्राचे सहाय्क प्राध्यापक डॉ. श्रीमंत राठोड यांनी केले.
कवठेसार (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, दत्त साखर कारखाना शिरोळ व कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षणात क्षारपड जमीन या विषयावर शेतकयाऱ्यांना मार्गदर्शनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी होते.
डॉ. राठोड म्हणाले, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाने पुढे होऊन शेतकऱ्यांना मदत करीत क्षारपडयुक्त जमिनी क्षारमुक्त केलेल्या कार्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरले आहेत.
डॉ. अशोक पिसाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी अधिकारी गणेश भोसले, मंडल कृषी अधिकारी संजय सुतार, शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, बाळासो पाटील, शरद भानुसे, काशिम मुलाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. महालिंग पाटील यांनी स्वागत केले, तर संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहायक अजित डवरी यांनी आभार मानले.