युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अलकेश कांदळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:04+5:302021-06-22T04:17:04+5:30
कोल्हापूर : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सचिवपदी गारगोटी येथील अलकेश कांदळकर ...
कोल्हापूर : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सचिवपदी गारगोटी येथील अलकेश कांदळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
२००३ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कांदळकर यांनी आपल्या राजकीय कामाची सुरुवात केली होती. तीन वर्षे त्यांनी भुदरगड तालुका भाजप अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २००२ ते २००७ आणि सध्या ते गारगोटी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. माैनी विद्यापीठावर शासन नियुक्त प्रतिनिधी, सन्मित्र समूहाच्या विविध संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि भाजपच्या ग्रामीण विभागांचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचे या निवडीकामी सहकार्य लाभल्याचे कांदळकर यांनी सांगितले.
२१०६२०२१ कोल अलकेश कांदळकर